TG Telegram Group & Channel
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯 | United States America (US)
Create: Update:

मार्कोनी यांनी १९३१ मध्ये आणखी लघुतर (सु.०·५ मी. लांबीच्या) तरंगांच्या प्रसरणावर संशोधन करण्यास प्रारंभ केला. १९३२ मध्ये त्यांनी व्हॅटिकन सिटी न पोप यांचे कास्तेल गांदॉल्फो येथील उन्हाळी निवासस्थान यांच्या दरम्यान जगातील पहिली सूक्ष्मतरंग रेडिओ दूरध्वनी प्रणाली बसविली. दोन वर्षानंतर त्यांनी सेस्त्री लेव्हांते येथे जहाजांच्या मार्गनिर्देशनासाठी आपल्या सूक्ष्मतरंग रेडिओ शलाकेचे प्रात्यक्षिक करून दाखविले. पुढे ५५ सेमी. इतक्या अल्प लांबीच्या तरंगाच्या पल्ल्यालाही क्षितिजीपुरती किंवा प्रेषक व ग्राही यांतील प्रकाशीय अंतराइतकीच मर्यादा नसते. असे मार्कोनी यांनी दाखवून दिले. १९२२ मध्ये त्यांनी अमेरिकन इन्सिटट्यूट ऑफ रेडिओ एंजिनिअर्स चा संस्थेत दिलेल्या व्याख्यानात रडारसंबंधी भाकित केलेले होते आणि १९३५ मध्ये इटलीमध्ये त्यांनी त्याच्या तत्त्वाचे व्यवहार्य प्रात्यक्षिकही करून दाखविले.

मार्कोनी त्यांना त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ नोबेल पारितोषिकाखेरीज इतर अनेक बहुमान मिळाले. त्यांत इटलीचा नाइट हा किताब (१९०२), रॉयल सोसायटी ऑफ आर्टसचे अल्बर्ट् पदक, अमेरिकेची फ्रँकलिन व फ्रिट्‌झ पदके(१९०९), ऑनररी नाइट ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल व्हिक्टोरियन ऑर्डर (१९१४), इटलिचे लष्करी पदक (१९१९) व मार्केझ ही परंपरागत पदवी हे विशेष उल्लेखनीय होते. १९२९ मध्ये त्यांची इटलीच्या सिनेटवर नियुक्ती झाली व पुढील वर्षी रॉयल इटालियन ॲकॅडेमीच्या अध्यक्षपदावर त्यांची निवड झाली. ते रोम येथे मृत्यू पावले.

>>Click here to continue<<

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Share with your best friend
VIEW MORE

United States America Popular Telegram Group (US)