*15 जून 1752 : वैज्ञानिक बेंजामिन फ्रँकलिनने आकाशात वीज असल्याचे सिद्ध केले.*
बेंजामिन फ्रैंकलिन हे संशोधक, वैज्ञानिक, राजकीय विचारक, राजकारणी, लेखक, व्यंगकार होते. बेंजामिन फ्रैंकलिन यांनी संयुक्त राष्ट्रांचे प्रारुप आणि संविधान बनविण्यासाठी सहाय्य केले. तसेच वैज्ञानिक कार्यामध्ये इलेक्ट्रिसिटी, गणित आणि नकाशे बनवणे सामील आहेत. बेंजामिन फ्रैंकलिन सारखे लेखक आपल्या बुद्धी आणि ज्ञानामुळे आळखले जातात. त्यांनी रिचड्स यांचे अल्मनैक प्रसिद्ध केले. त्यांनी बायोफोकल ग्लास चा शोध लावला आणि पहिली यशस्वी अमेरिकन लेंडींग लायब्ररी ची स्थापना केली. अमेरिकन इतिहासातील एक मोठे मिथक म्हणून आजही ज्याची नोंद आहे, ते म्हणजे बेंजामिन फ्रॅंकलिन आणि त्यांचा पतंग. शाळेच्या पुस्तकातून आपण वाचत आलो, की बेन्जामिन महाशय एकदा बाहेर पडले असतांना, अचानक आलेल्या भर वादळात त्यांनी आपला पतंग उडवला आणि त्या पतंगावर वीज कोसळली. अशा प्रकारे बेंजामिन यांनी अपघाताने का होईना, विजेचा शोध लावला.
सुदैवाची गोष्ट अशी, की बेंजामिन यांचे नशीब त्यावेळी त्याहून जोरदार होते. अहो, जर ती वीज खरोखरच त्या पतंगावर पडली असती, तर आमचे बेंजामिन महाशय त्यानंतर झालेल्या अमेरिकेच्या ऐतिहासिक स्वातंत्र्य जाहीरनाम्यावर सही करण्यास उपस्थित राहू शकले नसते. एवढेच नव्हे १७३२ ते १७५८ या काळात दर वर्षी प्रसिद्ध होणारे Poor Richard’s Almanac हे बेंजामिन यांनी टोपण नावाने लिहिलेले पंचांगही निघाले नसते. स्पष्ट म्हणायचे झाले तर त्या वादळी हवामानात पतंग उडवण्यातून त्यांचा वेडेपणा दिसून आला असता. गंमत म्हणजे अशा प्रकारचा विजेचा प्रयोग करू पाहाणारा बेंजामिन हे काही पहिलेच शोधक नव्हते. आणि या संबंधातील सत्य काय ते काळजीपूर्वक तपासले असता असे आढळून आले की बेंजामिन यांच्या कोणत्याही खासगी डायरीत आपल्या या पतंग उडवण्याच्या प्रयोगाची नोंद नाही.
एक मात्र खरे की फ्रॅंकलिन यांनी १ ऑक्टोबर १७५२ रोजी लिहिलेल्या एका पत्रात पतंग कसा तयार करावा आणि वादळाच्या वेळी कसा उडवावा, याचा बारीकसारीक तपशील दिलेला आहे. एक उत्तम शास्त्रज्ञ या नात्याने त्यांनी असा कोणताही प्रयोग केल्याचे लिहून ठेवलेले नाही. आणि तसे त्यांनी केलेही नसते. त्यांनी जे काही तोंडी वर्णन केले, ते जोसेफ प्रिस्टले या तत्कालीन नावाजलेल्या संशोधकाने लिहून घेतले होते. ही नोंद इतिहासकारांना पुरेशी आहे.
>>Click here to continue<<