TG Telegram Group Link
Channel: Maths [ गणित ]
Back to Bottom
आज मोठ्या भावाचे वय लहान भावाच्या वयाच्या दुप्पट आहे. 10 वर्षाने ते दीडपट होईल. तर त्यांचा आजच्या वयाची बेरीज किती असेल?

30
20
25
35

स्पष्टीकरण:

मोठा भाऊ. लहान भाऊ
आज 2p. p
10 वर्षाने. 2p+10. p+10
पण प्रत्यक्षात तर दीडपट दिले आहे. दीडपट म्हणजे 3/2
म्हणून
2p+10/p+10 = 3/2
4p+20 = 3p+30
4p-3p = 30-20
p = 10

यावरून त्यांचे आजचे वय
मोठा भाऊ 2p = 20
लहान भाऊ p = 10
म्हणून बेरीज = 30

निलेश आणि महेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे आणखी 12 वर्षाने हेच गुणोत्तर 5:7 होईल. तर दोघांच्या आजच्या वयात कितीचा फरक असेल?

18
9
12
15

स्पष्टीकरण:

आज निलेश महेश
3p 5p
+12 3p+12 5p+12
(5) (7)
म्हणून
(3p+12)/(5p+12) = 5/7
7(3p+12) = 5(5p+12)
21p+84 = 25p+60
25p-21p = 84-60
4p = 24
p = 6

यावरून
निलेश चे आजचे वय = 3p = 18
महेश चे आजचे वय = 5p = 30

त्यांच्या वयात फरक = 12 वर्षे
5_6280709777077044276.pdf
132.8 KB
जय हिंद मित्रांनो..
वयवारी प्रकरणाचे सर्व महत्वाचे प्रश्न आपण चॅनेल वर घेतले आहेत त्याच प्रमाणे त्याचे स्पष्टीकरण सुद्धा दिले आहे.

ही PDF त्या सर्व प्रश्न आणि स्पष्टीकरण यांची आहे.

या PDF चा आज चांगला अभ्यास करा.

उद्या सकाळी 9.00 वाजता वयवारी या प्रकरणावर टेस्ट होईल.

सेम असेच प्रश्न असतील - यामुळे तुम्हाला हे प्रकरण शिकण्यास मदत होईल.
काल दिलेल्या pdf चा अभ्यास तुमचा झाला असेल
आता आज त्या pdf वर आधारित असणारी ही टेस्ट सोडवा.

गणित विषयाची टेस्ट - वयवारी
जय हिंद मित्रांनो, @maths_ganit आणि @mastermaths या Channel आणि Group च्या माध्यमातून आपण गणित विषयाचे एक एक प्रकरण पूर्ण करत आहोत.

मागच्या आठवड्यात तुम्ही वयवारी या प्रकरणाचे उदाहरणे प्रश्न स्पष्टीकरण सहित अभ्यासले आहेत.
आज तुमचा अभ्यास योग्य दिशेने चालू आहे ना हे बघण्यासाठी त्यावर एक टेस्ट घेणार आहोत.

ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा -
https://www.studywadi.in/maths-in-marathi/

[ तुमच्या मार्क्स चे स्क्रीनशॉट या पोस्ट ला रिप्लाय करून नक्की शेअर करा.. बघू कोण किती मार्क्स घेते? ]
जय हिंद मित्रांनो... आज पासून आपण गणित विषयातील काळ काम वेग या प्रकरणाला सुरुवात करत आहोत.

अधिक माहिती वाचा -
सागर सरांचा गणित उपक्रम
राम एक काम 15 दिवसात तर श्याम तेच काम 10 दिवसात करतो. विकासचे एका दिवसाचे काम हे राम आणि श्यामच्या एका दिवसाच्या एकत्रित कामाइतके आहे. तर तिघे मिळून हे काम किती दिवसात पूर्ण करतील?

3 दिवस
4 दिवस
8 दिवस
2 दिवस
18 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 9 दिवसात संपवितात तर तेच काम करण्यास 12 मजुरांना किती वेळ लागेल जर ते रोज 6 तास काम करत असतील?

18 दिवस
12 दिवस
10 दिवस
15 दिवस
आजचे स्पष्टीकरण
-------------------------------------
राम एक काम 15 दिवसात तर श्याम तेच काम 10 दिवसात करतो. विकासचे एका दिवसाचे काम हे राम आणि श्यामच्या एका दिवसाच्या एकत्रित कामाइतके आहे. तर तिघे मिळून हे काम किती दिवसात पूर्ण करतील?

3 दिवस
4 दिवस
8 दिवस
2 दिवस

स्पष्टीकरण:

एकूण काम हे दिवसांच्या लसावि इतके मानू
15 आणि 10 यांचा लसावि = 30
आता
नाव दिवस एकूण काम क्षमता
राम 10 30 3
श्याम 15 30 2
विकास (6) 30 (5)
एकत्रित (3) (30) (10)
यावरून विकास जर दोघांइतके काम करतो तर त्याची क्षमता 3+2 = 5
यावरून तिघांची एकत्रित क्षमता = 2+3+5 = 10
म्हणून लागणारे दिवस = एकूण काम/ क्षमता = 30/10 = 3

टीप : चार्ट मध्ये ( ) मध्ये असणाऱ्या किमती आकडेमोड करून काढल्या आहेत आणि त्याचे स्पष्टीकरण खाली दिले आहे.
--------------------------

18 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 9 दिवसात संपवितात तर तेच काम करण्यास 12 मजुरांना किती वेळ लागेल जर ते रोज 6 तास काम करत असतील?

18 दिवस
12 दिवस
10 दिवस
15 दिवस

स्पष्टीकरण:

पद्धत :
(मजूर x तास x दिवस) = (मजूर x तास x दिवस)
म्हणून
18 x 8 x 9 = 12 x 6 x दिवस
18 x 8 x 9 ÷ ( 12 x 6 ) = दिवस
दिवस = 18
10 मुलांचे किंवा 4 माणसांचे एका दिवसाचे काम समान आहे. जर 2 माणसे आणि 5 मुले एक काम 10 दिवसात पूर्ण करत असतील तर तेच काम 20 मुले आणि 2 माणसे मिळुन किती दिवसात पूर्ण करतील?

3 दिवस
4 दिवस
5 दिवस
6 दिवस
नंदा एक काम 6 दिवसात तर सुनंदा तेच काम 3 दिवसात करते. जर दोघींनी मिळून ते काम करण्यास सुरूवात केली तर काम किती दिवसात पूर्ण होईल?

3 दिवस
1.5 दिवस
2 दिवस
2.5 दिवस
आजचे स्पष्टीकरण
--------------------------------
10 मुलांचे किंवा 4 माणसांचे एका दिवसाचे काम समान आहे. जर 2 माणसे आणि 5 मुले एक काम 10 दिवसात पूर्ण करत असतील तर तेच काम 20 मुले आणि 2 माणसे मिळुन किती दिवसात पूर्ण करतील?

3 दिवस
4 दिवस
5 दिवस
6 दिवस

स्पष्टीकरण:

10c = 4m
5c = 2m
एकूण काम = मनुष्यबळ x दिवस
= (2m + 5c) x 10
= (2m+2m) x 10
( 5c ऐवजी 2m घेता येतात – दिलेली माहिती )
एकूण काम = 40m

आता
एकूण काम = मनुष्यबळ x दिवस
40m = ( 20c + 2m ) x दिवस
40m = (8m + 2m) x दिवस
दिवस = 40m/10m
दिवस = 4 दिवस.

(20 मुले म्हणजे 8 माणसे हे दिलेल्या माहितीवरुन काढता येते)
-------------

नंदा एक काम 6 दिवसात तर सुनंदा तेच काम 3 दिवसात करते. जर दोघींनी मिळून ते काम करण्यास सुरूवात केली तर काम किती दिवसात पूर्ण होईल?

3 दिवस
1.5 दिवस
2 दिवस
2.5 दिवस

स्पष्टीकरण:

एकूण काम हे दिवसांच्या लसावि इतके मानू
6 आणि 3 यांचा लसावि = 6
आता
नाव दिवस एकूण काम क्षमता
नंदा 6 6 1
सुनंदा 3 6 2
एकत्रित (2) 6 3

कंसात दिलेल्या किमती आकडेमोड करून काढल्या आहेत
समान काम करण्यास A B आणि C अनुक्रमे 56 28 आणि 14 दिवस घेतात. जर तिघांनी मिळून हे काम पूर्ण केले असतील तर त्यांना लागणारा वेळ किती असेल?

6 दिवस
7 दिवस
8 दिवस
9 दिवस
क हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो तर ड हा ब आणि क यांच्या एकत्रित कामाइतके काम करतो. जर एक काम पूर्ण करण्यास ब ला 30 दिवस लागत असेल तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील?

10 दिवस
5 दिवस
12 दिवस
8 दिवस
आजचे स्पष्टीकरण
-------------------
समान काम करण्यास A B आणि C अनुक्रमे 56 28 आणि 14 दिवस घेतात. जर तिघांनी मिळून हे काम पूर्ण केले असतील तर त्यांना लागणारा वेळ किती असेल?

6 दिवस
7 दिवस
8 दिवस
9 दिवस

स्पष्टीकरण:

एकूण काम हे दिवसांच्या लसावि इतके मानू
56 28 आणि 14 यांचा लसावि = 56
आता
नाव दिवस एकूण काम क्षमता
A 56 56 1
B 28 56 2
C 14 56 4
A+B+C (8) 56 7

कंसात दिलेल्या किमती आकडेमोड करून काढल्या आहेत

-----------------------
क हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो तर ड हा ब आणि क यांच्या एकत्रित कामाइतके काम करतो. जर एक काम पूर्ण करण्यास ब ला 30 दिवस लागत असेल तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील?

10 दिवस
5 दिवस
12 दिवस
8 दिवस

स्पष्टीकरण:

एकूण काम हे दिवसांच्या लसावि इतके मानू
30 चा लसावि = 30
आता
नाव दिवस एकूण काम क्षमता
ब 30 30 1
क (15) 30 2
ड (10) 30 (3)
ब+क+ड (5) 30 (6)

कंसात दिलेली माहिती आकडेमोड करून काढली आहे
8 पुरुष किंवा 12 मुले एक काम 12 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 6 मुले आणि 2 पुरूष किती दिवसात पूर्ण करतील?

12
16
18
48
युसुफ आणि अकिब एक काम 12 दिवसात पूर्ण करतात पण एकटा अकीब ते काम करण्यास 21 दिवस घेतो तर एकटा युसुफ ते काम करण्यास किती वेळ घेईल?

9 दिवस
28 दिवस
18 दिवस
14 दिवस
सर्व टेस्ट साठी एकच पोस्ट

ही एक पोस्ट सेव्ह करून ठेवा कारण सर्व नवीन त्या त्या विषयाच्या टेस्ट याच पोस्ट मध्ये मिळतील.क्लिक करा टेस्ट द्या …

अनलिमिटेड

1 मराठी टेस्ट
2 इतिहास टेस्ट
3 भूगोल टेस्ट
4 विज्ञान टेस्ट
5 पंचायतराज टेस्ट
6 गणित टेस्ट
7 बुद्धिमत्ता टेस्ट
8 चालू घडामोडी
आजचे स्पष्टीकरण
-----------------------
8 पुरुष किंवा 12 मुले एक काम 12 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 6 मुले आणि 2 पुरूष किती दिवसात पूर्ण करतील?

12
16
18
48

स्पष्टीकरण:

दिलेली माहिती
8m = 12c
4m = 6c
2m = 3c
आता
एकूण काम = मनुष्यबळ x वेळ
= 8m x 12
= 96m
आता
एकूण काम = मनुष्यबळ x वेळ
96m = ( 2m + 6c ) x वेळ
96m = ( 2m + 4m ) x वेळ ( दिलेल्या माहितीनुसार )
96m = 6m x वेळ
वेळ = 16 दिवस
-----------------------

युसुफ आणि अकिब एक काम 12 दिवसात पूर्ण करतात पण एकटा अकीब ते काम करण्यास 21 दिवस घेतो तर एकटा युसुफ ते काम करण्यास किती वेळ घेईल?

9 दिवस
28 दिवस
18 दिवस
14 दिवस

स्पष्टीकरण:

एकूण काम हे दिवसांच्या लसावि इतके मानू
12 आणि 21 यांचा लसावि = 84
आता
नाव दिवस एकूण काम क्षमता
अकिब 21 84 4
युसुफ ? 84 ?
एकत्रीत 12 84 7

यावरून युसुफ ची क्षमता = 7-4 = 3
यावरून युसुफ ला लागणारे दिवस
= एकूण काम / क्षमता
= 84/3
= 28 दिवस
A आणि B एक काम 40 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम करण्यास B आणि C हे 24 दिवस आणि A व C हे 30 दिवस घेतात. तर तिघे मिळून हे काम किती दिवसात पूर्ण करतील?

5 दिवस
12 दिवस
8 दिवस
6 दिवस
3 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 9 दिवसात पूर्ण करतात. तर या कामाच्या 9पट काम 9 मजुरांना रोज तितकेच तास काम करून पूर्ण करण्यास किती वेळ लागेल?

18 दिवस
81 दिवस
21 दिवस
27 दिवस
आजचे स्पष्टीकरण
------------------

A आणि B एक काम 40 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम करण्यास B आणि C हे 24 दिवस आणि A व C हे 30 दिवस घेतात. तर तिघे मिळून हे काम किती दिवसात पूर्ण करतील?

5 दिवस
12 दिवस
8 दिवस
6 दिवस

स्पष्टीकरण:

एकूण काम हे दिवसांच्या लसावि इतके मानू
40 24 आणि 30 यांचा लसावि = 120
आता
नाव दिवस एकूण काम क्षमता
A+B 40 120 3
B+C 24 120 5
A+C 30 120 4
2(A+B+C) (10) 120 (12)

एकत्रित त्यांना दोन A B C यांना एकत्रितपणे 10 दिवस लागतात तर A B C यांना फक्त 5 दिवस लागतील.

यासारख्या उदा मध्ये येणारे उत्तर हे आकडेमोडीच्या अर्धे येत असते

------------------

3 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 9 दिवसात पूर्ण करतात. तर या कामाच्या 9पट काम 9 मजुरांना रोज तितकेच तास काम करून पूर्ण करण्यास किती वेळ लागेल?

18 दिवस
81 दिवस
21 दिवस
27 दिवस

स्पष्टीकरण:

पद्धत :
(मजूर x तास x दिवस)÷ काम1 = (मजूर x तास x दिवस)÷ काम2
दुसरे काम 9 पट आहे.
म्हणून
(3 x 6 x 9 )÷1 = ( 9 x 6 x दिवस )÷ 9
162 = 6 x दिवस
दिवस = 27
HTML Embed Code:
2024/05/05 07:39:50
Back to Top