TG Telegram Group Link
Channel: मराठी कविता
Back to Bottom
तिचं रुसणं त्याचं मनवणं
कधी त्याच्या सोबत, कधी त्याच्याशिवाय जगणं.

त्याचं तिच जमत नसतं पण एकमेकांशिवाय मात्र करमत नसतं
कधी रडतं, कधी हसतं.

गूणांच्या बाबतीत त्यांच गणीत फसतं. पण
प्रेम म्हणजे हेच तर असतं

त्याच्या हसण्यात तिचं जग बसतं -
कधी खचत कधी सावरत..
पण रोजच्या सदाफुली सारख बहरत--

त्याच्या आठवणीनं तिच मन तळमळत त्याच्याच काळजीने तिच काळीज हळहळत
प्रेम म्हणजे हेच तर असत
दोन शब्दात सामावलेलं जग असतं.
    
                                   ~tanishka

@Marathi_Kavita
आस..
आज आहे उद्या कदाचित दिसणारही नाही,
अस्तित्व नाहीसे झाल्यावर जाणीव होते याला अर्थ नाही.
तुझा हा अबोल दुरावा मनोमनच मारतो मला
तुझे ते दोषी शब्द आठवून मनालाही गहिवरा फुटला

              किती दिवस हा दुरावा........

पाणावलेले डोळे तरीही कोणाचाही  राग नाही
पाझरलेलं मन माझं त्याला कधीच विसावा नाही
डोळे नी कानही आसुसलेले  ,शब्द तुमचे ऐकण्यासाठी
किती हा राग ,कितीहा रुसवेपणा का आणि कशासाठी,

माफ करा मला चुकले मी ,पण अविश्वास मात्र घर करून गेला आयुष्यासाठी.....
कसा जिंकू मी हा विश्वास ....
  काळजावर दगड ठेवूनि प्रयत्न करते जिंकण्यासाठी
पुन्हा बोलालं का ओ बाबा माझ्याशी..
      आसुसलेल मन न चुकता वाट बघतय तुमच्या शब्दाची ..
                                  
                                  ....प्रतीक्षा टोपले🥀

@Marathi_Kavita
आणि काही नको फक्त...

तयार होउन बसली असेन मी तुझी वाट बघत
माझ्या केसांत मोगऱ्याचा माळा गुंफवण्यासाठी

मला तु येण्याची ओढ असेल
आला तर छान वाटेल
नाही आला तर, भिती जाणवेल

आस मात्र इतकीच असेल
तू नेहमी सोबत असावा

तूझ्या फुंकरिचा आवाज
माझ्या कानात जाणवत राहावा
            आणि
दोन गंधांचा मेळ झाल्यास
एक नवीन स्पर्श जाणवावा

मी कविता करत बसली असेल
              आणि
त्याचा शेवट फक्त तू लिहावा..

          ~✍🏻 तृप्ती कांबळे

@Marathi_Kavita
आपल्या आयुष्याची गाडीला कुठे ना कुठे. ब्रेक लागणार हे माहीत असून सुद्धा आपला जीवनप्रवास मस्त सुसाट वेगाने चालू असतो,कारण छान असं ध्येय गाठायचं असतं, मात्र वाटेत आलेल्या मुक्कामाला विसरायचं नसतं, कारण या मुक्कामाणेच प्रवासातला चांगला वाईट काळ अनुभवला असतो!,,,

एकमन#लेखक

 
@Ommshelke

@Marathi_Kavita
भविष्य  शेवटी तुझ्याच हातात .....


भयभीत तू युगायुगाचा ,संहार करून पुन्हा प्रयत्न कर
जीवन एकदाचेच वेड्या ,वेदनेचा तू यत्न कर

घुसमटु नको वादळात  ,देहाची तु ढाल कर
वाजतील नगाडे तूझ्या नावाचे,यशाला तू आव्हान कर

उगाच दोष नको परक्याना . स्वतशी आधी तू मैत्री कर
धोका दिला तुझ्याच चाहत्याने ,विसरून त्याचा धिक्कार कर

सोडून गेली प्रियेशी जरी स्वतःला आधी काबिल कर
कोणाचे टिकले या जगात प्रेम, काळजात आठवणीला बंधिस्त कर

टपून बसलेत लोक हारविण्यास ,यादीत नाव निश्चित कर
भले भले विकले पैश्यापुढे, कष्टाने स्वतःला तू सिद्ध कर.

नातेवाईक ही पाठ फिरवतात.पुस्तकाला तू यार कर
दोर भविष्याचा तुझ्याच हातात.वर्तमानाला आधी हाती धर.....


पिहू..,.......,..

@Marathi_Kavita
आपल्या भेटीची आठवण....
उमलून आले मनी आपसूक आपल्या प्रितीचे क्षण....
हाती तुझा हात अन् बिथरलेल मझ मन....
पोटातली फुलपाखरांची कुजबुज... अनं वाढलेली हृदयाची धडकन....
तुझ्या मिठीतल सुंदर स्वप्नांचं वन
कधी माय बापाच्या मायेची ऊब
कधी भावंडांच निस्वार्थ प्रेम
कधी मैत्रीतील निरपेक्ष जाणीव
कधी नवरा बायको मधला विश्वास
एक झालेला तुझा न माझा श्वास
प्रत्येक भेटितली तुझ्या मिठीची आस
तुझ्या नसण्यात ही तुझा भास

लहानग्या लेकरागत तुझ मझ्या कुशीत शिरण....
मी ही समाधानाने नव्या नात्याने तुझी आई होण....
तुझ्या खांद्यावर अलगद विसावण...
तुझ मला मायेनं थोपटण....
ह्या सऱ्यात वेळेची सीमा लांघण....
मग सुटलेली ती मिठी...
आणि फुटलेला अश्रूंचा बांध....

विरहा वेळी तो प्रेमळ स्पर्श तुझा.... अन् थांबलेलं मझ जग....
मनात चिंब भिजविणारा पाऊस... अन् भरलेलं माझ मन...
पानांची सळसळ त्यात विचारांचं वादळ....
आपुल्या भेटीची अशी ही आठवण...



                          ~ tanishka

@Marathi_Kavita
सर्वांच्या life मध्ये मैत्री हा Part🥰❤️खूपच महत्वाचा आणि तो प्रत्येकाला हवा असतो🥰🧡 कारण या नात्यामध्ये कुठलाच स्वार्थ लपलेला नसतो👌🧡 म्हणून म्हणता येईल की मैत्री मध्ये प्रेम झालं नाही तरी चालेल♥️☺️ पण मात्र प्रेमात मैत्री ही झालीचं पाहिजे💯 तरचं ते नातं आयुष्यभर टिकून राहतं👍💗!,,,

एकमन#लेखक

 
@Ommshelke

@Marathi_Kavita
इतरांना संपवण्यासाठी,
स्वतः स्वतपासून दूर होत जाने,
.
.
.
कोणत्याही प्रगतीचे लक्षण नव्हे.....

तेजस्विनी प्र. राऊत
 
@TejuRaut

@Marathi_Kavita
ऐन मतदानाच्या दिवशी तक्रारीला वाव नको.आजच मतदार यादीत नाव तपासा!

नाव नसल्यास अर्ज करण्याची संधी 22 एप्रिल 2024 पर्यंत

Website Link-
https://voters.eci.gov.in

#Vote For Democracy🔥

Join @Marathi_Kavita
Media is too big
VIEW IN TELEGRAM
आमचं मत वाया गेलं ! ( कविता )

@Marathi_Kavita
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
चुकीच्या माणसांना आपल्यावर राज्य करू दयाचे नसेल तर प्रत्येकाने मतदान करा !

@Marathi_Kavita
न ओळखले कधी मी
माझ्यात काय आहे
काय पाहिजे मला
काय मी शोधत आहे

दिवसांमागून दिवस
असेच निघून गेले
आता तरी काही कर
वेळ अजूनही आहे

काल होता वेळ
तसा आजही आहे
उठ तू आता
सुरुवात तर कर

मी तुझ्यातल्या तुला
बघितलं आहे
तू हा नाहीस
हे मी जाणून आहे

आहे तुझ्यातही
शक्ती अफाट
तू विसरून आहे

काय सांगशील जगाला
तू कोण आहेस ??


© गौरव काळे
   अकोट जि. अकोला

@Marathi_Kavita
आईची पुण्याई

अडाणी माय ची माझ्या
किती सांगू पुण्याई
मला शिकवून तिने
केली किती मोठी कमाई

तिच्या चरणाशी आहे
माझे विश्व सारे
तिच आहे माझी
ज्ञाणाई अन विठाई

काळाकृस देह तिचा
उन्हां,तान्हांत राबला
पै,पैका घामाचा तिने
माझ्या शिक्षणासाठी लावला

किती टोचले काटे तिच्या
अणवाणी पायला
तिच्यामुळे सुगंध आहे
आज माझ्या टायकोटाला

अठराविश्व दारिद्र्याचं
वरदान लाभलं होतं
संकटांना आयुष्याच्या तिनं
जात्यात दळल होतं

तिच्या कष्ट जिद्दी पुढे
आभाळ ही झूकलं होतं
तिच्यापोटी जंन्म घेवून
माझ आयुष्य सार्थक झालं होतं

✍️विकास सुखधाने
नांद्रा.ता.मेहकर जि.बुलढाणा


@Marathi_Kavita
HTML Embed Code:
2024/05/17 17:39:00
Back to Top