TG Telegram Group Link
Channel: मराठी कविता
Back to Bottom
सर्वांच्या life मध्ये मैत्री हा Part🥰❤️खूपच महत्वाचा आणि तो प्रत्येकाला हवा असतो🥰🧡 कारण या नात्यामध्ये कुठलाच स्वार्थ लपलेला नसतो👌🧡 म्हणून म्हणता येईल की मैत्री मध्ये प्रेम झालं नाही तरी चालेल♥️☺️ पण मात्र प्रेमात मैत्री ही झालीचं पाहिजे💯 तरचं ते नातं आयुष्यभर टिकून राहतं👍💗!,,,

एकमन#लेखक

 
@Ommshelke

@Marathi_Kavita
इतरांना संपवण्यासाठी,
स्वतः स्वतपासून दूर होत जाने,
.
.
.
कोणत्याही प्रगतीचे लक्षण नव्हे.....

तेजस्विनी प्र. राऊत
 
@TejuRaut

@Marathi_Kavita
Media is too big
VIEW IN TELEGRAM
आमचं मत वाया गेलं ! ( कविता )

@Marathi_Kavita
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
चुकीच्या माणसांना आपल्यावर राज्य करू दयाचे नसेल तर प्रत्येकाने मतदान करा !

@Marathi_Kavita
न ओळखले कधी मी
माझ्यात काय आहे
काय पाहिजे मला
काय मी शोधत आहे

दिवसांमागून दिवस
असेच निघून गेले
आता तरी काही कर
वेळ अजूनही आहे

काल होता वेळ
तसा आजही आहे
उठ तू आता
सुरुवात तर कर

मी तुझ्यातल्या तुला
बघितलं आहे
तू हा नाहीस
हे मी जाणून आहे

आहे तुझ्यातही
शक्ती अफाट
तू विसरून आहे

काय सांगशील जगाला
तू कोण आहेस ??


© गौरव काळे
   अकोट जि. अकोला

@Marathi_Kavita
आईची पुण्याई

अडाणी माय ची माझ्या
किती सांगू पुण्याई
मला शिकवून तिने
केली किती मोठी कमाई

तिच्या चरणाशी आहे
माझे विश्व सारे
तिच आहे माझी
ज्ञाणाई अन विठाई

काळाकृस देह तिचा
उन्हां,तान्हांत राबला
पै,पैका घामाचा तिने
माझ्या शिक्षणासाठी लावला

किती टोचले काटे तिच्या
अणवाणी पायला
तिच्यामुळे सुगंध आहे
आज माझ्या टायकोटाला

अठराविश्व दारिद्र्याचं
वरदान लाभलं होतं
संकटांना आयुष्याच्या तिनं
जात्यात दळल होतं

तिच्या कष्ट जिद्दी पुढे
आभाळ ही झूकलं होतं
तिच्यापोटी जंन्म घेवून
माझ आयुष्य सार्थक झालं होतं

✍️विकास सुखधाने
नांद्रा.ता.मेहकर जि.बुलढाणा


@Marathi_Kavita
राहुल धनगर

@Marathi_Kavita
मल्हार राख

@Marathi_Kavita
पूर्वा केळकर

@Marathi_Kavita
पारिजात तु

पाहण्या तुला जाहले आतुर
पाहता तुला झाले फ़ितुर
बदलता जेव्हा तो ऋतू
हा असा असशी समोर तु

मि रात्र अंधेरी अन प्रकाश तु
या हळव्या ह्रुदयाचा आधार तु
तना मनात सदैव बहरतो तु
माझिया मनिचा पारिजात तु
                       
                         _दिक्षा B.


@Marathi_Kavita
फक्त निबंध लिहायचा.
बाकी काहीही बंधन नाही.



But,
कर्म अशुद्ध असताना;
लेखन शुद्ध येईल का?


#JD
#PuneRoadAccident
#JusticeDemanded

@Marathi_Kavita
ऋतुजा मापारे

@Marathi_Kavita
भाजप येईल का कॉंग्रेस येईल......
शिवसेना येईल का राष्ट्रवादी येईल....
घरापुढे 4 झाडे लावा, सावली मात्र नक्की येईल.....

नाही तर............

अबकी बार 45° डिग्री पार
अगली बार 50° डिग्री पार

झाडे लावा, झाडे जगवा.

🌳🌳🌳🌳🌴🌳🌳🌳🌳

Join
@Marathi_Kavita
चांदण्यांची रात्र
अन्  मोगऱ्याचा सुवास तू

आयुष्याच्या वाटेत
सोबतीचा हात तू

लखलखत्या उन्हात
सावलीची साथ तू

झालो जरी हताश
उम्मेदिची आस तू

कसं विसरू तुला प्रिये
माझा अखेरचा श्वास तू

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

गौरव काळे
    अकोट  जि. अकोला

Join
@Marathi_Kavita
🌿तुळस🌿

हिरव्यागार तुळशीवर मंजुळा बहरली,
का कुणाच ठाऊक, तुझी आठवण झाली...
बघता बघता आठवणीत रमूनी गेले,
प्रत्येक पानात तुझेच रुप दिसु लागले...

हे पाहुन एक पान हळुच हसले,
(आणि म्हणाले)
तुझ्या डोळ्यात; मला कोणितरी दिसले,
माझ्या? असे कोण दिसले रे तुला,
जरा कळु तरी देत मला...

अगं...बघ जरा
तुझ्या गंधात, तुझ्या श्वासात तोच आहे...
लेऊनी तुळशीमाळ गळा
तुझा विठ्ठल उभा आहे...

                                           _दिक्षा B
.

@Marathi_Kavita
HTML Embed Code:
2024/06/01 18:18:48
Back to Top