Channel: चालू घडामोडी Deva Jadhavar
आनंददायी संगीत खुर्ची..(भारतीय बुद्धिबळ विश्वातली....)
कालच भारतीय बुद्धिबळा संबंधी एक पोस्ट टाकली होती त्यात म्हणलंच होतं की भारतीय बुद्धिबळाचा सध्याचा उत्कर्ष काळ बघता एक पोस्ट टाकेपर्यंत नवीन काहीतरी आनंद वार्ता कानावर पडते...
भारताचा प्रज्ञानंद सध्या अर्जुन ला मागे टाकत भारताचा नंबर एकचा खेळाडू आणि जगातला चार नंबरचा खेळाडू ठरला आहे
(सध्याच्या टॉप सिक्स मध्ये भारताचे ३ खेळाडू आहेत)...
या गोष्टीचं महत्त्व हे की यापूर्वी 2023 पर्यंत विश्वनाथन आनंद चक्क थोडे थोडके नव्हे तर तब्बल 36 वर्ष भारताचा अव्वल बुद्धिबळपटू होता... दोन वर्षांपूर्वी गुकेशने हा मान पटकावला... त्यानंतर अर्जुन गुकेश आणि प्रज्ञानंद या तिघांमध्ये अलटून पालटून अव्वल राहण्याची संगीत खुर्ची सुरू झाली आहे... आज बहुदा दुसऱ्यांदा या खुर्चीवर प्रज्ञानंदाच नंबर लागला!
तर झालं असं की... उझबेकिस्तान मध्ये तगड्या खेळाडूंचा समावेश असलेली Uz Chess नावाची एक स्पर्धा चालू होती... या स्पर्धेच्या आज शेवटचा राऊंड शिल्लक होता पण त्यापूर्वी भारताचा प्रज्ञानंद आणि अर्जुन हे लीडर असलेल्या अब्दुसत्तरोव पेक्षा एक पॉईंट ने आणि सिंदारोव पेक्षा अर्ध्या पॉईंट ने मागं होते (हे दोन्ही खेळाडू स्थानिक असून उजबेकिस्तान देखील बुद्धिबळ विश्वातलं सध्याचं तगड राष्ट्र आहे)
शेवटून दुसऱ्या राउंडमध्ये अर्जुन ला हरवल्यानंतर
प्रज्ञानंद चा अंतिम सामना काळ्या मोहऱ्यासहित होता ...टॉपर असलेल्या अब्दुसत्तरोव सोबत .. हा सामना जिंकण प्रज्ञानंदला भागच होतं आणि चेस च्या भाषेत winning at will म्हणतात तसं प्रज्ञानंदनी हा शेवटचा डाव काळे मोहरे असताना तो देखील स्पर्धेच्या टॉपर सोबत जिंकून दाखवला...
(हे भल्याभल्यांना जमत नाही) बाकीच्या निकालामुळे विजेतेपदाचा निर्णय टाई ब्रेक वर गेला आणि अशा वेळेस प्रज्ञानंद सहसा कच खात नाही...
या विजयाबरोबर या वर्षात प्रज्ञानंदने जिंकलेल्या महत्त्वाच्या स्पर्धांची संख्या तीन इतकी झाली आहे आणि मी यापूर्वी अनेकदा म्हणलो आहे त्याप्रमाणे तो माझा सध्याचा सर्वात आवडता भारतीय खेळाडू आहे..!
हे वर्ष त्याच आहेच पण लवकरच भविष्यात तो world champion होईल असं मनापासून वाटतंय (तो ज्या दिवशी होईल त्यादिवशी लक्षात ठेवा ...तुम्हाला हे इथं आधीच कळाल होत म्हणून 😀)
असो...तुम्हाला चेस आवडत असेल अन् अजून follow केलं नसेल तर नक्की करा...आवडत नसेल पण आवडून घ्यायचं असेल मग तर नक्कीच करा !
#Chess_With_Ani या hastag वर जुन्या काही पोस्ट मिळतील.
: अनिरुद्ध ढगे
#चेस #प्रज्ञानंद #chess #indianchess #prag #magnuscarlsen #Gukesh #Arjun ChessBase India

HTML Embed Code: