TG Telegram Group & Channel
Channel: Combine Exam-2020
Back to Bottom
Feedback😳
बॅच क्रमांक-3

आजचा एक दिवस फक्त admission चालू असेल,झालेल्या 3 टेस्ट सोडवून घेतल्या जातील,वरील माहिती वाचा आणि आजच तूमचे ऍडमिशन fix करून घ्या..


नाव नोंदणी-

नाव -
जिल्हा-
https://hottg.com/examadmin1611
peoject pre-paper-2(2).pdf
163.3 KB
Share peoject pre-paper-2(2).pdf
Project prelimary-paper 3(1).pdf
6.7 MB
Share Project prelimary-paper 3(1).pdf
Demo 【Question paper】
रात्री 8 नंतर admission बंद केली जातील
जर जंगलाचा विचार केला तर...

1) कोणता प्राणी सगळ्यात मोठा आहे?

उत्तर - हत्ती

2) कोणता प्राणी सगळ्यात उंच आहे?

उत्तर - जिराफ

3) कोणता प्राणी सगळ्यात चपळ आहे?

उत्तर - कोल्हा

4) कोणता प्राणी सगळ्यात वेगवान आहे?

उत्तर - चित्ताअसं असलं तरी सिंह जंगलाचा राजा आहे. वरीलपैकी एकही क्वालिटी नसताना सिंह जंगलाचा राजा आहे हे विशेष. असं का बरं? 

सिंह धैर्यवान आहे. तो कोणतीही गोष्ट आत्मविश्वासाने करतो. तो कशाचीही भीती बाळगत नाही, कधी घाबरत नाही. कोणत्याही परिस्थितीत सिंहाला कोणीही थांबवू शकत नाही. सगळ्यात जास्त जोखीम घेणारा सिंह आहे. सिंहाला विश्वास आहे की, कोणताही प्राणी त्याच्यासाठी अन्न होवू शकतो. सिंह कोणतीही संधी सहजा-सहजी सोडत नाही. तो शेवटपर्यंत प्रयत्न करत असतो. वरील गोष्टींचा विचार केला तर आपण सिंहाकडून काय शिकू शकतो.

आपण वेगवान नसलो तरी काही फरक पडत नाही. आपण सगळ्यात हुशार नसलो तरी काही फरक पडत नाही. आपण सगळ्यात स्मार्ट नसलो तरी काही फरक पडत नाही. आपण बुद्धिवान नसलो तरी काही फरक पडत नाही.

मग गरज कशाची आहे? तर तुमच्याकडे धैर्य असले पाहिजे. तुमच्याकडे प्रयत्न करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असली पाहिजे. तुमचा तुमच्या प्रयत्नांवर विश्वास असाला हवा. मी हे करू शकतो, हा तीव्र विश्वास तुमच्याकडे असला पाहिजे. महत्वाचं म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आत एक सिंह दडलाय. त्याला बाहेर काढण्याची गरज आहे. अंतप्रेरणेने कामाला लागा, स्वतःवर, स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा. तुमच्या प्रत्येक कृतीचा आनंद घ्या, तुम्हाला हवं ते तुम्ही नक्कीच प्राप्त करू शकता.

Kiran jadhav nd team
*कोणावरही आलेली वाईट वेळ निघून जातेच पण जाताना चांगल्या चांगल्या लोकांच खरं रूप दाखवून जाते . कपडे कितीही साफ व चकाचक असले तरी वाईट आणि मळलेले चारित्र्य लपू शकत नाही .......*
*जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा . मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात . म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा .काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते . म्हणून शब्दाला धार नको आधार हवा .....*
*आयुष्यात एखाद्याला रडवून कितीही पूजा - पाठ , होम - हवन केले तरी काही एक फायदा होणार नाही पण जर रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणले तर साधी अगरबत्ती सुद्धा लावायची गरज पडणार नाही .....
संता जब भी कपडे धोता , तब ही बारिश हो जाती।

1 दिन धूप निकली तो वो खुश हुआ और दुकान पे सर्फ लेने गया।

वो जैसे ही दुकान पर गया बादल ज़ोर -ज़ोर से गरज़ने लगे ।।

सांता फटाफट आसमान की तरफ मुह करके बोला...

क्या ???
किधर ???
मैं तो बिस्कुट लेने आया हूँ । कसम से ...
😜😜😜😜😜🙈😂
जीवनात कोणाचं तरी आपल्यासाठी चांगलं असणं हे दुसऱ्यासाठी वाईट असत
आणि दुसऱ्यासाठी चांगलं असलेले आपल्यासाठी वाईट असत
फरक फक्त एवढाच असतो की स्वतसाठी सर्व काही चांगलं असत दुसऱ्यासाठी वाईट असत
🎇 Staff Selection commission Exam 2020 Timetable 🎇
_*ऋतु संपल्यावरही पडणारा या पावसामुळे एक गोष्ट लक्षात अाली की गरज संपली की त्या गोष्टीच अोझं वाटु लागत.*_
Good morning😍
⚡️भारत आणि चीन मधील कमांडर पातळीवर चर्चेची सहावी फेरीही निष्फळ ठरली. यावरून लष्करी व राजनैतिक अशा दोन्ही पातळीवरील चर्चातून भविष्यात देखील काही साध्य होईल असे वाटत नाही. शेवटचा पर्याय म्हणून मोदी-जिनपिंग प्रत्यक्ष चर्चा आवश्यक आहे. 2017 चा दोखलाम तिढा अशा चर्चे नंतरच सुटला होता.
https://twitter.com/skdeolankar/status/1308633341919363072?s=19
कृष्णाने समोरच्या दोन टेकडयांचे रूपांतर सोन्याच्या टेकडयांमध्ये केले आणि अर्जुनाला म्हणाला......

हे सगळे सोने गावकरयांमध्ये वाटून टाक
अट एकच एकूण एक सोने तू दान केले पाहिजेस.

लगेच अर्जून जवळच्या गावात गेला आणि तिथे त्याने जाहीर केले की...

मी प्रत्येक गावकरयांला सोने दान करणार आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने टेकडीपाशी यावे.
लोक अर्जूनाच्या मागे टेकडीच्या दिशेने चालू लागले.

पुढे अर्जुन छाती काढून चालत होता.

मागे गावकरी त्याचा जयजयकार करत होते.

दोन दिवस, दोन रात्री काम चालू होते.

अर्जून खोदत होता आणि सोने काढून लोकांना देत होता.

पण टेकडी थोडीदेखील संपली नव्हती.

लोक सोने घेऊन घरी जायचे आणि परत येऊन रांगेत उभे राहायचे.

आता अर्जून अगदी दमून गेला होता.

पण त्याचा अहंकार त्याला माघार घेऊ देत नव्हता.

शेवटी त्याने कृष्णाला सांगितले की बास....!

आता यापुढे मी काम करू शकत नाही.
मग कृष्णाने कर्णाला बोलावले आणि सांगितले की.......

या दोन सोन्याच्या टेकडया आहेत त्या तू लोकांना दान करून टाकायच्या......
लगेच कर्णाने पंचक्रोशीतील गावकरयांना बोलवले आणि सांगितले की.....

या दोन सोन्याच्या टेकडया तुमच्या आहेत.

एवढे सांगून कर्ण तिथून निघून गेला.

लोक सोने वाहून नेऊ लागले. अर्जून चकित होऊन पाहात बसला.

हा विचार आपल्या मनात का आला नाही.....

या प्रश्नाने तो अस्वस्थ झाला. कृष्ण मिश्कीलपणे हसला आणि म्हणाला.....

अनावधानाने का होईना तू सोन्याकडे आकर्षित झालास.....!

तू गर्वाने प्रत्येक.......
गावक-याला सोने वाटू लागलास.

जणू काही आपण उपकार करतो आहोत अशा थाटात तू दान करत होतास.....!

कर्णाच्या मनात असले काहीही नव्हते.

त्याने दान केले आणि तो निघूनही गेला.

आपले कुणी कौतुक करतंय.....
गुणगान गातंय......
हे पाहण्यासाठी देखील तो थांबला नाही.
व्यक्ती प्रकाशाच्या मार्गावर चालत असल्याचे हे लक्षण आहे.
देणगीच्या बदल्यात लोकांनी आपले कौतुक करावे.....
शुभेच्छा द्याव्यात..... धन्यवाद द्यावेत अशी अपेक्षा ठेवणे.....
म्हणजे ते काही निरपेक्ष दान नसते.
कुठल्याही परताव्याची अपेक्षा न ठेवता दान करावे.............
"काय चुकलं" हे शोधायला हवं,
पण आपण मात्र "कुणाचं चुकलं" हेच शोधत राहतो......
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Always gives your 101% in any work success will be yours 👍
यांना STAR म्हणावं का?

एकिकडे पडद्यावर कोणाच्याही मनावर छाप पडेल अशा भुमीका करायच्या आणि दुसरीकडे Drugs पार्ट्या करायच्या. हे वागणं बरं नव्हे.

मी मुंबईला Film Writers Association ला माझ्या कथेच्या copyright नोंदणीसाठी गेलो होतो तेव्हा मित्रासोबत जवळपास अनेक बॅनरच्या offices ला कथेच्या निमित्ताने भेट दिली. तोपर्यंत माझा गैरसमज होता की, फक्त आपण MPSC करणारेच असं पुण्यात राहून Struggle करत आहोत.

जेव्हा मी अंधेरीतील छोटे छोटे Studios पाहीले तेव्हा मित्राने मला सांगितले की, इथे दिवसभर ऑडीशन चालतात.मी मित्राच्या रूमवर गेलो तेव्हा पाहिलं की,एका छोट्या खोलीत ते पाच जण राहत होते. कोण डंबेल्स मारत होता, तर कोण केसांना डाय एकजण आरशासमोर डायलॉग मारत होता. हे पाहून मला मनोमन वाटलं की, किती गर्दी आहे इकडे. STAR होण्याचं मोठं स्वप्न उराशी बाळगून येतात सगळे आणि STAR होतो एखादाच किंवा एखादीच.

विशेष म्हणजे मुलींचे ऑडिशन्स संध्याकाळी सुरू होतात असं मला समजले तेव्हा मी समजून गेलो की, किती कष्टातून त्या घडत असतात.
मित्र एका सांगत होता अमुक बॅनरने जर घेतलं तर लाईफच झाली म्हणून समजायचं.

आम्ही त्या बॅनरच्या ऑफिसला गेलो तेव्हा ऑडिशन्स साठी आलो असं समजून त्यांनी सांगितले की, आज बंद आहे तुम्ही जाऊ शकता. एकदम तुसड्या सारखं केलं. मी म्हणालो," माझ्याकडे एक पटकथा आहे त्यासंदर्भात मला सरांना भेटायचं आहे." हे ऐकताच तात्काळ मॅनेजर साहेबांना कळविण्यात आले. मॅडम स्वता आल्या आम्हाला चहापान केला गेला. सर बाहेर असल्याने नंतर पुन्हा या असं त्या म्हणाल्या शिवाय सरांना फोन करून कल्पना दिली गेली. त्यांचा तो वरवरचा का असेना पण, तो पाहूनचार पाहून मला नवल वाटले. तेव्हा परतिच्या प्रवासात मित्र सांगत होता की, लेखकांना खूप मानपान देतात. कारण लेखन या क्षेत्राचा गाभा आहे. मला पण जरा बरं वाटलं कारण आतापर्यंत मला तसं काहीच चांगलं वाटत नव्हतं.

येतानाच जलसा बंगला लागला मित्राने गाडी थांबवली. गेटवर वाचमनने सांगितले की, शनिवारी सायंकाळी या साहेब बाहेर येतात. मी एक सेल्फी घेतला आणि आम्ही तिथुन निघालो.. माझ्या डोक्यात तेच ते सारखं फिरत होते एकिकडे जलसा आणि दुसरीकडे अंधेरीतील मित्राची रुम. बापरे!किती ही विषमतेची दरी. भयानक आहे हे सगळं.

प्रामुख्याने दोन गोष्टी नमुद कराव्याश्या वाटतात. एक म्हणजे ते एक आभासी जग आहे आणि तिथे जास्तीत जास्त Struggler शेवटी व्यसनांकडे वळतात.
आणि दुसरी म्हणजे आपले स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे Struggler शेवटी एक चांगले नागरिक घडतात. हाच मुळात फरक आहे.

आपण समान्य अध्ययनाचा परिपूर्ण अभ्यास करतो, समाजसुधारक वाचतो. आपली एक तात्विक बैठक तयार होते. पण त्याचं तसं नसतं ज्यांची तात्त्विक बैठक असते ते अभिनय क्षेत्रातील लोकं खरे Star आहेत पण, जे यशस्वी झाल्यानंतर करोडो युवक युवतींच्या गळ्यातील ताईत बनतात आणि असं Drug पार्टी करतात अशी दुतोंडी भुमिका घेतात त्यांना खरंच Star म्हणावं का?

खरंतर आता वेळ आहे युथला सत्य दाखविण्याची. आभासी जगाचे डोळ्यावरचे झापड काढून टाकण्याची.

आपला लेखक- निलेश डावखरे🤓
2020/09/12 21:13:15
Load New Feed
Back to Top